रायगडमध्ये १०वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन

रायगडमध्ये १०वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन

वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र आयोजित १०व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला आज रायगडमध्ये प्रारंभ झाला आहे. २२ आणि २३ जानेवारी रोजी खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथे अखिल भारतीय वारकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना नियमांचे पालन करत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन दिवसांच्या संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी सांप्रदायाच्या दिंडी या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या आहेत. ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करीत टाळ आणी मृदुंगाच्या ठोक्यावर नाचत संत साहित्याची दिडी काढण्यात आली. या संमेलनाला महसुलमंत्री बाळासाहेब थोरात उद्घाटक म्हणुन उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी २३ जानेवारी रोजी समारोप समारंभ काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे हे या परिषदेच्या स्वगताध्यक्ष आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version