नांदेड : नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका शाळेत 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील मुख्याध्यापकाने त्याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. मुलीने आरडाओरड केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर मुलीच्या पालकांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध पोक्सो कायद्यासह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील संशयित असलेल्या 50 वर्षीय मुख्यध्यापक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.