BMC Election 2026 VBA List : प्रकाश आंबेडकरांची वंचितही महापालिका निवडणुकीसाठी सज्ज; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

BMC Election 2026 VBA List : प्रकाश आंबेडकरांची वंचितही महापालिका निवडणुकीसाठी सज्ज; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : मुंबई महानगरपालिका  निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी मुंबईत युतीची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबईत वंचित बहुजन आघाडी एकूण 62 जागांवर निवडणूक लढणार आहे. मुंबईत वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांपैकी 62 जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. तर उर्वरित जागांवर काँग्रेस आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडे देण्यात आलेल्या 62 जागांमध्ये वॉर्ड क्र. 6, 11, 12, 84, 95, 127, 153 आणि 225 यांसारख्या विविध महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. आज वंचितने जाहीर केलेल्या पहिला यादीत एकूण 10 उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. जाहीर केलेले उमेदवार हे मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवारांचा समावश आहे.

हेही वाचा : Prakash Mahajan On Raj Thackeray : “मी पुंडलिक झालो, पण विठ्ठलानेच वीट फेकून मारली”, नाराज प्रकाश महाजनांनी व्यक्त केली राज ठाकरेंबाबतची भावना

वंचितने आज प्रभाग क्रमांक 54, 160, 169, 114, 114, 118, 119, 127, 146, 155,173 या जागांसाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेस आणि वंचितच्या या युतीमुळे मुंबईत दलित, मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या मतांमध्ये होणारे विभाजन थांबण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट फायदा काँग्रेस-वंचितला होऊ शकतो. एकीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने निर्माण झालेल्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने हा वंचित कार्डचा मास्टरस्ट्रोक वापरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या युतीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version