Thackeray Brother Interview : भ्रष्टाचार, मुंबई, मराठी माणूस आणि बरचं काही…; मतदानापूर्वी ठाकरे बंधूंची महामुलाखत, 1.40 मि. चा टीझर पोस्ट

ठाकरे बंधू येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढणार आहेत.
Thackeray Brother Interview : भ्रष्टाचार, मुंबई, मराठी माणूस आणि बरचं काही…; मतदानापूर्वी ठाकरे बंधूंची महामुलाखत, 1.40 मि. चा टीझर पोस्ट

मुंबई : ठाकरे बंधू येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढणार आहेत. या निमित्ताने नुकतीचं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत खासदार संजय राऊत आणि अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. ही मुलाखत दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याचा पहिला भाग उद्या, 8 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. मात्र आज, या मुलाखतीचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर 1 मि. 40 सेकंदाचा असून यामध्ये ठाकरेंची रोखठोक शैली पाहायला मिळत आहे. संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांच्या प्रश्नांना उद्धव तसेच राज ठाकरे बेधडकपणे उत्तरं देताना दिसत आहेत. त्यामुळे टीझर पाहून संपूर्ण मुलाखत पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. 

हेही वाचा : BJP – MIM Alliance: सत्तेसाठी भाजपचा एमआयएमशी घरोबा? राजकारणातील सर्वात ‘अजब’ युती, कुठं घडलं हे?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version