देशाचे संरक्षणदलाचे प्रमुख बिपिन रावत हे देशातील पहिले सीडीएस अधिकारी आहे. सीडीएस अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी बिपीन रावत हे एक आहेत.
बिपिन रावत हे मुळचे उत्तराखंडचे असून त्यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी झाला. रावत यांचे वडीलदेखली लष्करात असल्यामुळे बिपिन रावत यांचेही बालपण सैनिकांमध्येच गेले. त्यानंतर रावत यांनी इंडियन मिलिट्री अकादमीत प्रवेश घेतला. त्याचवेळी त्यांना ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले आणि अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.
सैन्यात प्रवेश केल्यानंतर १९७८मध्ये रावत यांना यश मिळाले. १९७८मध्ये बिपिन रावत यांनी बेस्ट कॅडेट म्हणून लष्करी प्रशिक्षण उत्तीर्ण केले. सैन्यात असताना बिपिन रावत यांना उत्तीर्ण कामगिरीमुळे त्यांना सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल यासह अनेक पदकांनी सन्मानित करण्यात आले.
२०१६साली सीडीएस बिपीन रावत यांची लष्करप्रमुख पदावर नियुक्ती झाली. बिपीन रावत यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या असून संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी बिपीन रावत हे एक आहेत. बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाल्यानंतर त्यांची भारतातील पहिली सीडीएस म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती झाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.