संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइनच

संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइनच

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची परीक्षा अखेर ऑफलाईनचं होणार आहे. १ जून पासून विद्यापिठाच्या उन्हाळी ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.परीक्षा आणि मूल्याकंन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. मात्र एनएसयूआयच्या आंदोलनानंतर अमरावती विद्यापिठाच्या उन्हाळी परीक्षेचं स्वरूप बदलण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांने ऑनलाइन परीक्षेची मागणी केली होती. ऑनलाइन परीक्षेसाठी एनएसयूआयनं आंदोलन देखील केलं होतं. ऑनलाइन परीक्षेचा आग्रह धरणारे विद्यार्थी नाराज झाले आहेत.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परिक्षेची मागणी केली होती. म्हणूनच परीक्षा प्रचलित पध्दतीने होणार आहे. पावने दोन लाख विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी प्रत्येक तासाला १५ मिनिटं जास्त मिळणार आहेत. प्रश्नपत्रिका या बहुपर्यायी असणार आहेत. बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू या पद्धतीनी परिक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर विद्यापीठाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या परिक्षा वेळापत्रक

 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिक्षा अभयांत्रिकी, तांत्रिक फार्मसीच्या विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परिक्षा या १ ते ८ जूनमध्ये होतील आणि लेखी परिक्षा या १० ते ३० जून या कालावधीमध्ये होतील. तसेच अभयांत्रिकी, तांत्रिक फार्मसीतच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परिक्षा १ ते ८ जूनमध्ये होतील आणि लेखी परिक्षा १० ते ३० जूनमध्ये होतील. तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यापीठातील प्रात्यक्षिक परिक्षा या ६ ते १५ जूनमध्ये होतील, लेखी परिक्षा १७ जून ते १० जुलैमध्ये होतील, आणि वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील महाविद्यालयातील प्रात्यक्षिक परिक्षा या ६ ते १५ जूनमध्ये होतील तसेच लेखी परिक्षा १७ जून ते १९ जुलै मध्ये दरम्यान होतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version