नवी दिल्ली: क्रिक्रेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन प्रिमीयर लीगमधील (आयपीएल) लोकप्रिय संघांपैकी एक असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ (आरसीबी) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरसीबी संघाची मालकी असलेल्या युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने (यूएसएलने) आरसीबी संघ विक्रीसाठी ठेवल्याची माहिती समोर आली आहे. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड ही ब्रिटनस्थित बहुराष्ट्रीय कंपनी डिआयएजिईओची (DIAGEO) पॅरेंट कंपनी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरसीबी संघाचे मूल्यमापन तब्बल 2 अब्ज डॉलर्स (सुमारे 17 हजार 762 कोटी रुपये) एवढे करण्यात आले आहे. या व्यवहारासाठी जागतिक गुंतवणूक बॅंक ‘सिटी’ यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ (आरसीबी) खरेदी करण्यास इच्छुक असल्याची बातमी समोर आली आहे.
यादरम्यान, इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक आणि पहिले लीग कमिशनर ललित मोदी यांनीही सोशल मीडियावर ट्विट करून या चर्चेला अधिक जोर दिला आहे. त्यांनी लिहिले की, ‘आतापर्यंत आरसीबी संघाच्या विक्रीबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. एकेकाही हा संघ विकण्यासाठी नकार देण्यात आला होता. मात्र, सध्या असे दिसून येत आहे ती आरसीबीच्या मालकांनी त्यांच्या बॅलन्स शीटमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा संघ खरेदी करण्यास जे कोणी इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. आरसीबी हा संघ विक्रीसाठी पूर्णपणे उपलब्ध आहे. या संघाला खरेदी करण्यासाठी अनेकांनी होकार दर्शवला आहे. ही डील आयपीएलमध्ये नवीन आर्थिक विक्रम स्थापित करू शकतो’.
There have been a lot of rumour about the sale of an @IPL franchise specifically @RCBTweets – well in the past they have been denied. But it seems the owners have finally decided to take it off their balance sheet and sell it. I am sure having won the IPL last season and also… pic.twitter.com/ecXfU5n5v5 — Lalit Kumar Modi (@LalitKModi) September 29, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी गुजरात टायटन्स च्या बहुसंख्य शेअर्सची व्रिकी झाली आहे. टोरेंट ग्रुपने सीव्हीसी कॅपिटलकडून 67% हिस्सा खरेदी करून बाजारात खळबळ माजवली होती. त्यानंतर, आता आरसीबीच्या विक्रीच्या चर्चेने क्रिक्रेटविश्वात खळबळ उडवली आहे. त्यामुळे, हा संघ कोण खरेदी करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.