काँग्रेसचे नाराज नेते नवी दिल्लीत

काँग्रेसचे नाराज नेते नवी दिल्लीत

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या १० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, उमेदवारांची नावे जाहीर होताच काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस हायकमांडने सोमवारी महाराष्ट्रातील प्रमुख मंत्र्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलवली आहे. मात्र दिल्लीतील हायकमांड बरोबरची काँग्रेस मंत्र्यांची बैठक पुढे ढकलण्यात आली असून बैठक पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती समोर येते आहे.

राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत आहे, असा आरोप काही काँग्रेस मंत्र्यांनी केला आहे. काँग्रेसच्या विषयांबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही, अशी महाराष्ट्रातील काँग्रेस मंत्र्यांची भावना आहे. महाविकास आघाडीत सध्याच्या घडीला खरंच धुसफूस आहे की काय, असं चित्र निर्माण झालं आहे. कारण शिवसेनेचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतंच एक मोठं विधान केलं होतं.

महाविकास आघाडी सरकारमध्ये त्रिसूत्री कार्यक्रम पाळला जात नाही. निधी वाटपाबाबत ठरलेला फॉर्म्युला वापरला जात नाही. आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसबाबत ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खरंच बिघाडी आहे की काय? अशी चर्चा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version