‘धारावीचा पुनर्विकास केंद्रामुळे रखडला’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘धारावीचा पुनर्विकास केंद्रामुळे रखडला’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

धारावीचा पुनर्विकास हा केंद्राच्या धोरणामुळे रखडला असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केला आहे. तसेच महाविकास आघाडीचे सरकार धारावीचा पुनर्विकास करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. दरम्यान, मविआ सरकार कष्टकऱ्यांना त्यांच्य हक्कांची घरे बांधून देणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

‘आमदारांसाठी कायमस्वरुपी ३०० घर’

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, केंद्राच्या ज्या जागा मुंबईमध्ये आहेत, त्या जागांसाठी पाठपुरावा करून त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. मुंबईचा विचार हा अनेकदा सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून करण्यात आला. आता त्या कष्टकऱ्यांना घरे मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने गांभिर्याने विचार केला आहे. झोपडपट्टीधारकांना घरे मिळालीच पाहिजे, असे सांगत आमदारांसाठी कायमस्वरुपी ३०० घर बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच नुसती घोषणा नव्हे तर योजना अंमलात आणतो, असेही ते म्हणाले.

राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबईचे रुप दाखवणारा हा अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले. मुंबईत अन्न, वस्त्र मिळते मात्र घर मिळत नाही. त्यामुळे लोकांच्या घरांसाठी राज्य सरकारने विचार केला आहे. मुंबईचा विचार सोन्याची अंड देणारी कोंबडी म्हणून केला आहे. हे सोन्याचं अंड घेऊन जातात, परंतु कोबंडीची देखभाल कोण करणार? असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version