पोलखोल रथाची तोडफोड प्रकरणी भाजप आक्रमक

पोलखोल रथाची तोडफोड प्रकरणी भाजप आक्रमक

मुंबईतील चेंबूरमध्ये भाजपच्या पोलखोल अभियानाच्या रथयात्रेची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी हल्लेखोऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली होती. मात्र, अद्याप हल्लेखोऱ्यांवर कारवाई झाली नसल्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तोडफोड केल्याप्रकरणी हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी करत भाजप नेत्यांनी मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.

महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई पालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपाच्यावतीने पोलखोल अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. चेंबूर कॅम्पयेथील भाजपा कार्यालयात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत या रथ यात्रेची सुरूवात होणार होती.  मात्र, रथयात्रेच्या आधल्या दिवशी रथाची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे रथाची तोडफोड करणाऱ्या हल्लेखोऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली. मात्र, अद्याप हल्लेखोऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे भाजप आक्रमक झाले असून भाजप नेते आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात चेंबूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच ही तोडफोड शिवसेनेनेच केली असल्याचा संशयही भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version