सध्या सोशल मीडियावर चेहऱ्यावर बर्फ चोळण्याचा व गरम पाण्याची वाफ घेण्याचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. अनेक सेलिब्रिटी आणि ब्युटी इन्फ्लुएन्सर सकाळी उठल्यावर व झोपायच्या आधी या कृती करण्याचा सल्ला देतात. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, बर्फ थेट चेहऱ्यावर लावण्यापेक्षा एका स्वच्छ सुती कापडात गुंडाळून हलक्या हाताने 1-2 मिनिटे मसाज करणे अधिक योग्य आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि चेहरा फ्रेश दिसतो. गरम पाण्याची वाफ चेहऱ्याला दिल्याने त्वचेची रोमछिद्रे (pores) मोकळी होतात आणि त्वचा खोलवर स्वच्छ होते. वाफेमुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण (blood circulation) सुधारते, ज्यामुळे त्वचेला ऑक्सिजन मिळतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते.
चेहऱ्याला बर्फ लावण्याचे फायदे
1. सूज कमी दिसण्यास मदत
2. लालसरपणा तात्पुरता कमी होऊ शकतो
3. चेहरा फ्रेश दिसतो
4. त्वचेला थंडावा मिळतो
5. थकवा कमी दिसण्यास मदत
गरम पाण्याची वाफ घेण्याचे फायदे
1. नाक बंद असल्यास तात्पुरता आराम
2. चेहऱ्याला उबदारपणा मिळतो
3. त्वचेवरील तेल आणि घाण सैल होण्यास मदत
4. चेहरा स्वच्छ करण्यापूर्वी त्वचा मऊ होण्यास मदत
5. सर्दीमुळे होणाऱ्या अस्वस्थतेत काहींना आराम मिळू शकतो
Viral Myths About Hair: केसांबद्दलचे 10 व्हायरल गैरसमज जाणून घ्या..
बर्फ कधी?
चेहरा सुजलेला, लाल किंवा थकलेला दिसत असेल तर थंडावा तात्पुरता आराम देऊ शकतो. बर्फ थेट त्वचेवर न ठेवता कापडात गुंडाळून वापरणे चांगले.
वाफ कधी?
नाक बंद होणे किंवा कफामुळे अस्वस्थता असल्यास वाफेमुळे तात्पुरता आराम मिळू शकतो. मात्र खूप गरम वाफ घेणे टाळा.
मग चेहऱ्यावर बर्फ चोळणे आणि गरम पाण्याची वाफ घेणे नेमकं कधी आणि कोणासाठी उपयुक्त ठरतं? त्वचेचा प्रकार, समस्या आणि योग्य पद्धत लक्षात घेऊनच हे उपाय करणे गरजेचे आहे. बर्फामुळे चेहरा तात्पुरता फ्रेश आणि सूज कमी दिसण्यास मदत होऊ शकते, तर वाफेमुळे त्वचेला उब मिळण्यासोबत नाक बंद असल्यास तात्पुरता आराम मिळू शकतो. मात्र, अतिरेक केल्यास त्वचेवर जळजळ किंवा कोरडेपणा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावरील ट्रेंड पाहून हे उपाय करण्यापेक्षा आपल्या त्वचेला काय योग्य आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.