‘मिचाँग’मुळे महाराष्ट्रात ‘या’ दिवशी पावसाची शक्यता

‘मिचाँग’मुळे महाराष्ट्रात ‘या’ दिवशी पावसाची शक्यता

नवी दिल्ली, ५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे ‘मिचाँग’ चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला मर्यादीत प्रमाणात तडाखा बसण्याची शक्यता आहे. राज्यातील निवडक जिल्ह्यांत ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवार ६ डिसेंबर आणि गुरुवार ७ डिसेंबर रोजी विदर्भात निवडक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. शेतकऱ्यांना शेतीची कामं किमान तीन दिवस पुढे ढकलण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन गुरुवार ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार २० डिसेंबर २०२३ या कालावधीत नागपूर येथे आहे. हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी थंडी जाणवण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version