‘आमची बदनामी करणारे तोंडावर पडले’

‘आमची बदनामी करणारे तोंडावर पडले’

निवडणुकांआधी पंतप्रधानांचा कर्नाटक दौरा असून यावेळी पीएम मोदी यांनी कर्नाटकातील तुमकुरू येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या राष्ट्रीय कंपनीच्या हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण केले. मोदींच्याच हस्ते २०१६ मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते. हा आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, २० वर्षांत येथे १००० हून अधिक हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत. आशियातील हा सर्वात ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना आहे, जो हेलिकॉप्टर उत्पादन क्षमता आणि इको-सिस्टम वाढवेल. सुरुवातीला या कारखान्यात दरवर्षी सुमारे ३० हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं म्हणाले, आमची बदनामी करणारे तोंडावर पडले. आणि हा आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना असल्याचे देखील या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version