निवडणुकीत मतदान ओळखपत्रास निवडणूक आयोगाकडून ‘हे’ पर्याय

निवडणुकीत मतदान ओळखपत्रास निवडणूक आयोगाकडून ‘हे’ पर्याय
सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मतदान पार पडत आहे.  निवडणूक आयोगाने दिलेलं मतदान ओळखपत्र यासाठी आवश्यक  आहे. परंतु ते नसल्याच कुठलं ओळखपत्र चालेल याची यादी निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. मतदानासाठी देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

हे पर्याय

1. वाहन चालक परवाना – Driving Licence
2. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम)
3. छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक
4. पॅनकार्ड (PAN card)
5. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्सद्वारे दिलेले स्मार्टकार्ड
6. मनरेगा जॉबकार्ड
7. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
8. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
9. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
10. आधारकार्ड
11. पासपोर्ट

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version