विदर्भ राज्य आंदोलन समितीचं विविध मागण्यांसाठी रेल रोको

विदर्भ राज्य आंदोलन समितीचं विविध मागण्यांसाठी रेल रोको

विदर्भ राज्य आंदोलन समितीने मनीष रेल रोको केलं आहे. मनीष नगर रेल्वे क्रॉसिंग वर रेल रोको करण्यात आलं.

वेगळ्या विदर्भ आणि राज्यातील विजेचे दर निम्मे करण्याच्या मागणीसाठी हे रेल रोको आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन मोठ्या पोलीस बंदोबस्तात केलं जातं होतं. पोलिसांनी या आंदोलनाला वेळत रोखत आंदोलन उधळून लावलं.

काही वेळ विदर्भवादी आणि पोलीस समोरा समोर आले. त्यामुळे थोडा वेळ तणावाची परिस्थिती झाली होती.

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यानंतर आंदोलन संपलं. मात्र पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप विदर्भवादी नेता राम नेवले यांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version