वैशाली नागवडे यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले; रघुनाथ कुचिक पीडितेचा आरोप

वैशाली नागवडे यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले; रघुनाथ कुचिक पीडितेचा आरोप

शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका २४ वर्षीय पीडीतेला जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी भाजप नेते चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत आवाज उठवला आहे. यावेळी त्यांच्यासोबत पीडीत तरुणीसुद्धा उपस्थित होत्या.

रघुनाथ कुचिक यांच्यावर पीडीत तरुणीने लैगिंग शोषण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पीडीतीने पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या तक्रारीकडे वैशाली नागवडे यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

पीडीतेने रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिंक शोषणाचा आरोप करत पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. मात्र, त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. त्यामुळे रघुनाथ कुचिकला जामीन कसा मिळाला? असा सवाल भाजप नेते चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण?

२४ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका तुरणीशी शारिरीक संबंध ठेवून तिला गरोदर करण्यात आले. त्यानंतर त्या तरुणीचे गर्भपात करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्या तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीमध्ये हा प्रकार ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडल्याचने नमूद करण्यात आले आहे. पुणे, गोवा याठिकाणी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये हा सर्व प्रकार घडला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version