बियाणी हत्येप्रकरणी अजून दोघांना अटक

बियाणी हत्येप्रकरणी अजून दोघांना अटक

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्ये प्रकरणी नांदेड पोलिसांनी आणखी दोन आरोपीना अटक केली. या प्रकरणात एकूण आरोपींची संख्या नऊ झाली आहे. कृष्णा पवार आणि हरीश बाहेती असे अटक केलेल्या आरोपींचे नावं आहेत. बियाणी यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झाले आहेत. बियाणी यांना कट रचून मारण्यात आलं असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सांगितलं होतं. मात्र अजूनही बियाणी यांच्या खुनाचे मुख्य सूत्रधार सापडले नाही. यामुळे मुख्य सुत्रधाराला शोधण्याचं आव्हान अजूनही नांदेड पोलिसांसमोर आहे.

काय आहे प्रकरण ?

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर ५ एप्रिल रोजी अज्ञातांनी गोळीबार करण्यात आला होता. यात बियाणी आणि त्यांचा वाहन चालक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. नांदेड येथील खासगी रुग्णालयात संजय बियाणी यांना दाखल करण्यात आले असताना उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस तपास करत असून यापूर्वी पोलिसांनी सात जणांना अटक करण्यात आली असून या दोघांना अटक केल्यानंतर आरोपींची संख्या नऊ झाली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. संजय बियाणींच्या हत्येपूर्वी आरोपींनी नांदेडमध्ये दोन महिने रेकी केली होती. तसंच बियाणी यांच्यावर पाळतही ठेवण्यात आली होती.

दरम्यान, संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे बिल्डर होते. त्यांच्यावर खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version