नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ आज नागपूरात मोर्चाचे आयोजन करण्यातं आलं. ‘लोकाधिकार मंच’ या बॅनर अंतर्गत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात संघ परिवारातील विविध संघटना सहभागी झाल्या. यशवंत स्टेडियम पासून निघालेला मोर्चा संविधान चौकात थांबला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोर्चाला संबोधित केलं.
1947 च्या पूर्वी अखंड भारत होता. बांगलादेश,अफगाणिस्तान,पाकिस्तान अशी विभागणी झाली.
पाकिस्तान जर मुस्लिम राष्ट्र आहे, तर त्या देशातील शीख, हिंदू आणि इतर धर्मियांवर अन्याय झाल्यावर ते कुठे जाणार, असं महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) विचारलं होतं. त्या लोकांना भारतात आश्रय मिळणार असे गांधींनी त्यावेळी सांगितलं होतं. पाकिस्तानने स्वतःला मुस्लिम राष्ट्र घोषित केलं तेव्हा महात्मा गांधींनी भारत हिंदू राष्ट्र असणार नाही असं घोषित केलं होतं.
भारताबाहेरून येणाऱ्यांना शरणार्थी म्हणतात.
हा शरणार्थी शब्द कोणाला लागू आहे हे बाबासाहेबांनी संविधानात (Constitution of India) लिहिलं आहे.
जे जैन, शीख, बौद्ध अल्पसंख्याक आहेत त्यांना हा शब्द लागू आहे.
जर हिंदू, शीख, बौद्ध, जैन धर्मियांसाठी संविधानात निर्वासित शब्दाचा वापर केला आहे तर मुस्लिमांविषयी हा शब्द का वापरला नाही? कारण इतर मुस्लिम देश त्यांना शरण देऊ शकतात हे संविधान निर्मात्यांना माहीत होतं.
पाकिस्तान, बांगलादेश ही मुस्लिम राष्ट्रं (Islamic countries) आहेत. अनेक राष्ट्रं मुस्लिम राष्ट्रं म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
या मुस्लिमांना देश सोडण्याची वेळ आली तर ते या देशात शरण मागू शकतात.
परंतु हिंदू कुठे शरण मागणार? त्यांच्यासाठी भारत हाच देश आहे.
हिंदुत्वाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने केली आहे, हिंदुत्व हे जीवन जगण्याची पद्धती आहे
हिंदुत्व (Hindutva) व भारताचा संबंध हा केवळ पूजा पद्धती नाही
धर्माचा अर्थ कर्तव्य आहे, संविधानाने आम्हाला धर्मस्वातंत्र्य दिले आहे
मुस्लिम नागरिकांना शरणार्थी म्हणून जगात 100 ते 150 देश आहेत, हिंदू, बौद्ध, इसाई, पारशी लोकांसाठी कोणताही देश नाही.
हिंदू धर्म (Hindu) सर्व धर्मांचा, सर्व ईश्वरांचा सन्मान करण्यास शिकवतो…
भारतातील मुस्लिमांना बाहेर देशात गेल्यावर हिंदू म्हणूनच ओळखलं जातं.
हिंदू ही जीवन जगण्याची पद्धत आहे हे हिंदूंना जातीवादी म्हणणाऱ्यांनी समजून घ्यावं.
पाकिस्तानात (Pakistan) 1947 साली हिंदूंची लोकसंख्या 22% होती. ती आता 3 टक्क्यांवर आली आहे. मग बाकीचे 19% हिंदू गेले कुठे? त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं, महिलांवर अत्याचार झाले.
गडचिरोलीत बांगलादेशी निर्वासितांचा कॅम्प आहे, नागपूरात सिंध प्रांतातून आलेल्यांचा कॅम्प आहे, त्यांना आम्ही नागरिकत्व (Citizenship) देण्याचा निर्णय घेतला आहे, असं गडकरींनी यावेळी स्पष्ट केलं.
मी स्वयंसेवक आहे, संघात काम केलंय. आमचे नेते कधीही मुस्लिमांना देशाबाहेर काढण्याचं बोललेले नाही. आम्ही या देशातील कुठल्याही मुस्लिमाला बाहेर करण्याचं बोलत नाहीय, जे घुसखोर आहेत त्यांना बाहेर करण्याचं आम्ही म्हणतोय.
‘अदनान सामी’ला आम्ही भारतीय नागरिकत्व प्रदान केलंय. ‘निकाह’ सिनेमातील पाकिस्तानी अभिनेत्री सलमा आगाने मला सांगितलं की, आपण पेशावरमधील आहोत, राज कपूर घराण्याशी संबंधित आहोत, तिलाही आम्ही भारतीय नागरिकत्व दिलं आहे
हा कायदा हिंदू, मुस्लिम, अल्पसंख्याकांच्या विरोधात नाहीये.
Vote Bank साठी राजकारण सुरू आहे, मोदी (Narendra Modi) आणि भाजपच्या (BJP) नावाची भीती दाखवली जात आहे
मुस्लिमांना (Muslims in India) न्याय आम्हीच देऊ शकतो.
मुस्लिमांना आवाहन आहे की काँग्रेसच्या (Congress) दूष्प्रचाराचे बळी पडू नका. तुम्हाला कुठलाही विरोध नाही. तुम्ही मशिदीत जा, प्रार्थना करा.
सुखी, समृद्ध भारताची निर्मिती हाच आमचा सिद्धांत व नीती आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.