Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदूंवर अत्याचाराचं सत्र सुरूच; तरुणावर चाकूने हल्ला करून पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

शरीयतपूर जिल्ह्यात खोकन चंद्रा नावाच्या एका हिंदू तरुणावर हिंसक जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जगभरात संताप व्यक्त केला जात आहे.<br/>
Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदूंवर अत्याचाराचं सत्र सुरूच; तरुणावर चाकूने हल्ला करून पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

Bangladesh Violence: भारताच्या शेजारील देश बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांविरुद्धचा हिंसाचार दिवसेंदिवस अधिक क्रूर होत चालला आहे. शरीयतपूर जिल्ह्यात खोकन चंद्रा नावाच्या एका हिंदू तरुणावर हिंसक जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जगभरात संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं ?

दरम्यान, बुधवारी (31 डिसेंबर 2025) रोजी खोकन चंद्रा हे आपल्या घरी परतत असताना ही घटना घडली. एका हिंसक टोळीने त्यांना घेरून बेदम मारहाण केली. त्यानंतर गुंडांनी त्यांच्यावर चाकूने वार केले आणि पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आपला जीव वाचवण्यासाठी खोकन यांनी जवळच असलेल्या एका तलावात उडी मारली, ज्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचले. सध्या त्यांच्यावर शरीयतपूर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन आठवड्यांतील चौथा हल्ला

गेल्या 2 आठवड्यांत बांगलादेशातील हिंदू समाजावरील हा 4 था मोठा हल्ला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीयांविरुद्ध हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, या सरकारच्या कार्यकाळात अल्पसंख्याकांविरुद्ध आतापर्यंत 2,900 हून अधिक हिंसाचाराच्या घटनांची नोंद झाली आहे.

हेही वाचा – Switzerland Blast: स्वित्झर्लंड हादरलं ! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान स्की रिसॉर्टमध्ये भीषण स्फोट; अनेक पर्यटकांचा मृत्यू

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या परिस्थितीवर कडक शब्दांत चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'भारत बांगलादेशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अल्पसंख्याकांविरुद्ध सुरू असलेला द्वेष आणि हिंसाचार दुर्लक्षित करण्याजोगा नाही.' 

हेही वाचा – Rare Snowfall in Saudi Deserts : सौदीच्या वाळवंटात बर्फवृष्टी; निसर्गाचे बदलते रूप भारतासाठी मोठी धोक्याची घंटा

शेख हसीना यांचा युनूस सरकारवर हल्लाबोल

बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी या परिस्थितीला युनूस सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. युनूस सरकारने अतिरेक्यांना सूट दिली असून दोषी दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडले आहे. हे सरकार अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version