एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख बनवली आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. हे गाणं तुफान गाजलं होतं.अभिमानास्पद गोष्ट म्हणजे भारतातील पहिल्या सिनेमाने हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कारावर नाव नोंदवलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सिनेमाच्या टीमची कौतुकाने पाठ थोपटली आहे. ट्विट करत मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत मोदी म्हणाले, ‘सर्वात खास सिद्धता…. या प्रतिष्ठित सन्मानाने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला आहे.’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं आहे.
A very special accomplishment! Compliments to @mmkeeravaani, Prem Rakshith, Kaala Bhairava, Chandrabose, @Rahulsipligunj. I also congratulate @ssrajamouli, @tarak9999, @AlwaysRamCharan and the entire team of @RRRMovie. This prestigious honour has made every Indian very proud. https://t.co/zYRLCCeGdE — Narendra Modi (@narendramodi) January 11, 2023
अनेक सेलिब्रिटींनी देखील आरआरआर सिनेमाचं कौतुक केलं आहे. अभिनेता शाहरुख खानने देखील सिनेमाचं कौतुक केलं आहे. किंग खान ट्विट करत म्हणाला, ‘सर आताच उठलो आणि गोल्डन ग्लोबमधील विजयावर उत्साह साजरा करत ‘नाटू-नाटू’ गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात केली.’ सध्या अभिनेत्याचं ट्विट देखील तुफान व्हायरल होत आहे.
आज जगप्रसिद्द झालेलं गाणं कालभैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी गायलं. गाणं शूट करायला बराच वेळ लागला. युक्रेनच्या प्रेसिडेंशियल पॅलेसच्या बॅकग्राउंडमध्ये ‘नाटू-नाटू’ गाण्याचं शुटिंग करण्यात आलं आहे. RRR मधील नाटू नाटू या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.