राज्यातील हनुमान चालीसा वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमच्या घरी हनुमान चालीसा म्हणायची होती, तर चांगल्या भाषेत सांगायचे होते, निरोप धाडायचा होता. मात्र, दादागिरी करून याल तर दादागिरी मोडून काढू, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्यांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आमच्या घरात हनुमान चालीसा म्हणायची होती तर आम्हाला व्यवस्थित सांगायचे होते. या अगोदरही अनेक पाहुणे मातोश्रीवर येऊन गेले. पाहुणे येती घरी, तोचि दिवाळी हे आम्हाला माहित आहे. आम्ही तुमचे मातोश्रीवर स्वागत केले असते. परंतु तुम्ही दादागरी करून येत असाल तर दादागिरी मोडून काढू’, असे ते म्हणाले.
लवकरच मला जाहीर सभा घेऊन तकलादू नवहिंदुत्वाद्यांचा समाचार घ्यायचा आहे. मास्क काढून त्यांच्या समाचार घ्यायचा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.