भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला आहे. तुम्ही लवंगी लावली मात्र मी आता दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. तसेच ठाकरे सरकारमधील ३ मंत्र्यांचे घोटाळे उघड करण्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला आहे.
किरीट सोमय्यांनी ट्विट केले की, ‘दिवाळीनंतर फटाके फोडणार. ठाकरे सरकारचे आणखी ३ मंत्रींचे ३ घोटाळे आणि जावयाचे ३ घोटाळे एकंदर ६ घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार, खुलासा करणार.’
दिवाळी नंतर फटाके फोडणार. ठाकरे सरकार चे आणखी ३ मंत्री चे ३ घोटाळे आणि जावयाचे ३ घोटाळे एकंदर ६ घोटाळे चा पर्दाफाश करणार, खुलासा करणार @BJP4Maharashtra — Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 31, 2021
किरीट सोमय्या म्हणाले की, दिवाळीमध्ये फटाके फोडले जातात. परंतु मी दिवाळीनंतर फटाके वाजवणार आहे. एकूण आठ जणांचे फटाके मी फोडणार आहे. ठाकरे सरकारमधील तीन मंत्रींचे तीन घोटाळे आणि त्यांच्या जावयांचे तीन घोटाळे असे एकंदर ६ घोटाळ्यांचा खुलासा मी करणार आहे, असे ते म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.