Suraj Chavan Becomes Father: गुलीगत किंग आणि बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण बाबा झाल्याची गोड बातमी समोर आली आहे. काल जन्माष्टमीच्या दिवशी त्याची पत्नी संजना हिला कन्यारत्न प्राप्त झाले. हॉस्पिटलमधील डिलिव्हरी नंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान वायरल होत आहे. यात सुरज, नातेवाईक यांना आनंद गगनात मावेनासा झालाय. सूरज चव्हाणने ही गोड़ बातमी देत, 'लक्ष्मी आली' अशी पोस्ट स्टोरीला शेअर केली.
तसेच त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. जन्माष्टमीच्या शुभ दिवशी हा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने सूरज-संजना खूप खुश आहेत. आता दोघं लेकीचं नाव काय ठेवणार आहेत, अशी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
लोकप्रिय मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'झापूक झुपूक' चित्रपटातून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. बिग बॉस मराठीमुळे त्याला अधिक लोकप्रियता मिळाली. यामुळे आता फॅमिली मॅन झालेला सूरज आता कोणत्या चित्रपटात झळकणार आहे, हे पाहण्यासारखे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.