औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी रात्री अनावरण

औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी रात्री अनावरण

औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी रात्री १०.३० ते ११.३० दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशात हा सर्वाधिक उंच पुतळा असून चौथऱ्यासह पुतळ्याची उंची ५२ फूट एवढी आहे.

औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याचे शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता अनावरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशातील सर्वात मोठा पुतळा असणार आहे. या पुतळ्या अनावरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीद्वारे राहणार आहेत तर उद्योगमंत्री सुभास देसाई, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

क्रांती चौकातील पुतळ्याचा अनावरण सोहळा रात्री १० ते १२ वाजेपर्यंत चालणार असून या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १८ फेब्रुवारीला पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी रात्री १० ते १२ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. तर रात्री १२ नंतर मात्र कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचे आदेश देण्यात आले  आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version