Sonam Wangchuk: जंतर-मंतर आंदोलनादरम्यान मोठा ट्विस्ट! रुग्णालयात सोनम वांगचुक यांची केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नेमकं काय घडलं?

दिल्लीतील आंदोलनादरम्यान गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात सोनम वांगचुक आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा तसेच डॉ. जितेंद्र सिंह यांच्यात सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली
Sonam Wangchuk: जंतर-मंतर आंदोलनादरम्यान मोठा ट्विस्ट! रुग्णालयात सोनम वांगचुक यांची केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नेमकं काय घडलं?

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली. सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक यांची गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत जवळपास 45 मिनिटे विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

सध्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू असून त्याचा आज 32 वा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असून त्यामध्ये देशभरातील अनेक संघटना आणि राजकीय नेत्यांनीही सहभाग घेतला आहे. आंदोलन अधिक तीव्र होत असताना सरकारकडून संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे या बैठकीतून दिसून आले.

हेही वाचा: Aditya Thackeray : क्रूर दडपशाही आणि विद्यार्थ्यांच्या अटकेच्या विरोधात निषेध मोर्चा; 'वन नेशन, वन इमोशन'च्या अंतर्गत आदित्य ठाकरेंनी केले आंदोलनाचे आयोजन

सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना यापूर्वी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाही त्यांनी आपले उपोषण कायम ठेवले असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी वांगचुक यांचे मत सविस्तरपणे जाणून घेतले. आंदोलनाची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि पुढील संवादाची दिशा यावर चर्चा झाली. सरकार चर्चेसाठी सकारात्मक असल्याचेही मंत्र्यांनी बैठकीदरम्यान स्पष्ट केल्याचे सांगितले जाते.

या चर्चेदरम्यान वांगचुक यांनी कोणताही निर्णय घेताना आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांच्या भावना आणि भूमिका लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत मांडल्याची माहिती आहे. त्यामुळे कोणताही पुढील निर्णय हा आंदोलनातील प्रतिनिधींशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे संकेत त्यांनी दिल्याचे समजते.

हेही वाचा: Preity Zinta Tweet: 'विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे, पण देशविरोधी…'; प्रीती झिंटाने व्यक्त केली मोठी चिंता, पोस्ट व्हायरल

दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके यांनी सरकारशी चर्चेसाठी स्वतः जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारनेच जंतर-मंतर येथे येऊन आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधावा, अशी त्यांची भूमिका कायम आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये प्रत्यक्ष चर्चा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर देशभरात संतापाचे वातावरण असून विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक प्रमुख नेत्यांनी जंतर-मंतरला भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात झालेली ही बैठक आंदोलनाच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाची ठरू शकते. सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यात संवादाचा मार्ग खुला होतो की संघर्ष आणखी तीव्र होतो, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version