Smriti Mandhana-Palash Muchhal Wedding: स्मृती आणि पालाशचं लग्न 7 डिसेंबरला होणार? स्मृतीच्या भावाने सांगितलं सत्य

सोशल मीडियावर पसरलेल्या चर्चांना त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.
Smriti Mandhana-Palash Muchhal Wedding:  स्मृती आणि पालाशचं लग्न 7 डिसेंबरला होणार? स्मृतीच्या भावाने सांगितलं सत्य

smriti mandhana-palash muchhal wedding: भारतीय महिला क्रिकेटची स्टार फलंदाज स्मृती मंधाना आणि संगीतकार पालाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांच्या लग्नाचा मुहूर्त 23 नोव्हेंबरला ठरल्याची माहिती समोर आली होती. प्री-वेडिंग सेरेमनीज म्हणून हल्दी आणि संगीतचे काही फोटोही व्हायरल झाले. मात्र, अगदी लग्नाच्या दिवशीच अचानक स्मृतींच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने संपूर्ण सोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर इंटरनेटवर अनेक अफवा पसरू लागल्या त्यापैकी सर्वात मोठी म्हणजे आता त्यांचे लग्न 7 डिसेंबरला होणार असल्याची बातमी.

या चर्चेला अखेर पूर्णविराम देत, स्मृती मंधानाचे भाऊ श्रवण मंधाना यांनी स्वतः पुढे येऊन परिस्थिती स्पष्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाची कोणतीही नवी तारीख अजून निश्चितच करण्यात आली नाही. सध्या इंटरनेटवर सुरु असलेली सर्व चर्चा आणि 7 डिसेंबरबाबत चालू असलेली “कन्फर्म तारीख” ही सर्व माहिती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रवण यांनी सांगितले, “या अफवांबद्दल आम्हालाही काही माहिती नाही. लग्न फक्त पुढे ढकलण्यात आले आहे, पण नवी तारीख ठरलेली नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर पसरणाऱ्या गैरसमजाला मोठा ब्रेक बसला.

दरम्यान, स्मृती मंधानाने स्वतःच्या इंस्टाग्रामवरून प्री-वेडिंग फोटोज आणि काही व्हिडिओ हटवले आहेत. लग्न पुढे ढकलल्यानंतर तिने ते पोस्ट काढून टाकल्यामुळे चाहत्यांमध्ये आणखी चर्चा रंगली होती. बऱ्याचजणांना वाटले की दोघांमध्ये काही बिनसले आहे का? पण कुटुंबीयांनी स्पष्ट केल्यानंतर आता हा मुद्दा निवळला आहे.

स्मृती आणि पालाश एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. दोघांचे रिलेशन सुरुवातीला पूर्णपणे खाजगी ठेवण्यात आले होते. नंतर त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींकडून आणि काही कार्यक्रमांमधील उपस्थितीतून दोघांचे नाते दृढ झाल्याचे समोर आले. संगीतकार आणि प्रोड्युसर म्हणून ओळख मिळवलेला पालाश मुच्छल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केलेली स्मृती या दोघांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे.

स्मृती मंधानाच्या क्रिकेट करिअरकडे पाहता ती महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी आणि सातत्यपूर्ण खेळाडूंमध्ये गणली जाते. तिने आतापर्यंत भारतासाठी टेस्ट, वनडे आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली आहे. तिच्या बॅटमधून आलेले शतकांचे फटके, डावाला मिळणारी धडाड आणि शांत स्वभाव या सगळ्यांमुळे ती भारतीय महिला संघातील एक स्थिर आणि महत्त्वाची खेळाडू आहे.

लग्नाची नवी तारीख अद्याप निश्चित नसली तरी तिच्या चाहत्यांना आशा आहे की कुटुंबातील परिस्थिती नीट झाल्यावर दोघेही लवकरच आपल्या खास दिवसाची नवी घोषणा करतील. तोपर्यंत चाहत्यांचे आणि क्रीडा विश्वाचे लक्ष या चर्चेवरच आहे. स्मृती आणि पालाश कधी विवाहबंधनात अडकणार?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version