‘तिसरे विश्वयुद्ध झाले तर अण्वस्त्रांचा वापर होईल’ – रशिया

‘तिसरे विश्वयुद्ध झाले तर अण्वस्त्रांचा वापर होईल’ – रशिया

रशिया-युक्रेन युद्धाचा आज सातवा दिवस आहे. रशियाचा युक्रेनवर तीव्र लढा सुरूच असून युक्रेनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केला असून युक्रेनही रशियाला जशास तसे उत्तर देत आहे. तर दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत. दरम्यान, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी सूचक विधान केले आहे. ‘तिसरे विश्वयुद्ध झाल्यास अणवस्त्रांचा वापर होईल’, असे सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे.

‘तिसरे विश्वयुद्ध झाल्यास त्यामध्ये अणवस्त्रांचा वापर होईल आणि ते फार विद्धवंसक असेल’, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. तसेच युक्रेनवर हल्ला करण्याचा रशियाचा निर्णय योग्य असून युक्रेनला अण्वस्त्र मिळाली तर रशियासाठी धोकादायक ठरू शकते, असेही ते म्हणाले.

अण्वस्त्र सतर्कतेचे पुतिन यांचे आदेश

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्चिमात्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २७ फेब्रुवारी रोजी अण्वस्त्र दलास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नाटो देशांच्या आक्रमक विधानांमुळे आपण हे आदेश दिल्याचे समर्थनही पुतिन यांनी केले. पुतिन यांनी अण्वस्त्र सतर्कतेचे आदेश देताना केवळ ‘नाटो’ देशांच्या कथित विधानांचाच नाही, तर पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांचा उल्लेख केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version