रशियाचा युक्रेनवर हल्ला; युक्रेनमध्ये आणीबाणी लागू

रशियाचा युक्रेनवर हल्ला; युक्रेनमध्ये आणीबाणी लागू

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई केली आहे. रशियाने युक्रेनच्या चार शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीव, खारकी, ओडेशा, मारियूपोलमध्ये रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

रशियाच्या लष्करी सैन्यांनी युक्रेनवर हल्ला केला आहे. युक्रेनच्या चार प्रमुख शहरांवर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केल्यामुळे युक्रेनमध्ये आणीबाणी लागू केली आहे. तसेच नागरिकांसाठी विमान वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर राजधानी कीवमध्ये भीतीदायक परिस्थिती उद्भवली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक शहर सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला करत इशारा दिला आहे. शस्त्र टाका, अन्यथा रक्तपात अटळ असा इशारा रशियाने युक्रेनला दिला आहे. अमेरिकेकडून रशियाच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. तसेच युक्रेनवर करत असलेल्या कारवाईत कोणत्याही देशाने हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version