राहुल गांधी दोन दिवसीय मणिपुर दौऱ्यावर

राहुल गांधी दोन दिवसीय मणिपुर दौऱ्यावर

मणिपूर, २८ जून २०२३, प्रतिनिधी: मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राहुल गांधी २९ आणि ३० जूनला मणिपूरमध्ये विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी मंगळवारी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

राहुल गांधी मणिपूर दौऱ्यायात इंफाळमधील मदत शिबिरांना भेट देणार आहेत. तसेच सिव्हिल सोसायटीच्या प्रतिनिधींच्या भेटीगाठी घेणार आहेत. मणिपूरच्या इम्फाळ आणि चुरचंदपूर येथील नागरी समाजाच्या प्रतिनिधींशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोमवारी म्हणाले,
संपूर्ण देश मणिपूरवर पंतप्रधान मोदींचे म्हणणे ऐकण्याची वाट पाहत आहे. त्यांनी आधी मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांना त्यांच्या पदावरून हटवावे. तसेच मणिपूरमधील सर्व पक्षांशी चर्चा करून सामायिक राजकीय तोडगा काढावा असे आवाहनही खरगे यांनी केंद्र सरकारला केले.

मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट केले की, अखेर गृहमंत्री (अमित शाह) यांनी पंतप्रधान मोदींशी मणिपूरवर चर्चा केली आहे. गेल्या ५५ ​​दिवसांपासून मोदींनी मणिपूरवर एक शब्दही बोलला नाही. मोदीजींना मणिपूरबद्दल खरच काही वाटत असेल तर सर्वप्रथम तुमच्या मुख्यमंत्र्याला हटवा. अतिरेकी संघटना आणि समाजकंटकांकडून शस्त्रे जप्त करा. सर्व पक्षांशी चर्चा सुरू करा आणि एक समान राजकीय मार्ग काढा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version