मुंबई: देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत आजही स्थिरता कायम आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजही कोणताही बदल न करता दर जुन्याच पातळीवर ठेवले आहेत. पेट्रोल सध्या 94 ते 105-106 रुपये प्रति लिटर या दरम्यान विकले जात असून डिझेलचे दर 78 ते 97 रुपये प्रति लिटरच्या श्रेणीत आहेत. मात्र, खासगी कंपन्यांनी दरवाढ करून ग्राहकांना धक्का दिला आहे.
खासगी कंपन्यांकडून मोठी दरवाढ
नायरा एनर्जी नंतर आता शेल इंडियानेही 1 एप्रिल 2026 पासून इंधन दर वाढवले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्याने खासगी कंपन्यांनी नुकसान भरून काढण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
दर किती वाढले?
शेल इंडियाने पेट्रोलच्या दरात तब्बल 7.41 रुपयांची वाढ केली आहे, तर डिझेलच्या दरात 25 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खासगी पेट्रोल पंपांवर पेट्रोलचे दर सुमारे 119 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 123 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत.
आजचे प्रमुख शहरांतील दर
देशातील विविध शहरांमध्ये आज पेट्रोल-डिझेलचे दर पुढीलप्रमाणे आहेत:
दिल्ली – पेट्रोल 94.77 रुपये, डिझेल 87.67 रुपये
मुंबई – पेट्रोल 103.54 रुपये, डिझेल 90.03 रुपये
कोलकाता – पेट्रोल 105.45 रुपये, डिझेल 92.02 रुपये
बेंगळुरू – पेट्रोल 102.92 रुपये, डिझेल 90.99 रुपये
चेन्नई – पेट्रोल 100.80 रुपये, डिझेल 92.39 रुपये
पटना – पेट्रोल 105.18 रुपये, डिझेल 92.04 रुपये
जयपूर – पेट्रोल 104.88 रुपये, डिझेल 90.36 रुपये
पोर्ट ब्लेअर – पेट्रोल 82.46 रुपये, डिझेल 78.05 रुपये
तिरुवनंतपुरम – पेट्रोल 107.48 रुपये, डिझेल 96.48 रुपये
प्रीमियम इंधनही महागले
Indian Oil Corporation नेही प्रीमियम पेट्रोल XP100 च्या दरात 11 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे त्याची किंमत 149 रुपयांवरून थेट 160 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. तसेच ‘एक्स्ट्रा ग्रीन’ प्रीमियम डिझेलची किंमत 91.49 रुपयांवरून 92.99 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढली आहे.
सरकारी दर स्थिर असले तरी खासगी कंपन्यांच्या वाढीमुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. जागतिक बाजारातील चढ-उतार कायम राहिल्यास येत्या काळात इंधन दरांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.