हिमाचलमध्ये जमीन खचली, इमारती कोसळल्या

हिमाचलमध्ये जमीन खचली, इमारती कोसळल्या

कुलू, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : हिमाचल प्रदेशमध्ये कुलू येथे जमीन खचल्यामुळे नवा बस थांबा तसेच आठ इमारती कोसळल्या. बस थांबा आणि इमारतींना तडे गेले होते. काही दिवसांपूर्वीच हा संपूर्ण परिसर प्रशासनाने रिकामा केला होता. यामुळे जमीन खचून नवा बस थांबा आणि इमारती कोसळल्या, पण जीवितहानी टळली. । व्हिडीओ

बस थांब्याच्या परिसरात सार्वजनिक वाहतूक विभागाशी संबंधित चार इमारती होत्या. या व्यतिरिक्त बस थांब्याजवळ चार निवासी इमारती होत्या. काही दिवसांपूर्वी या परिसरातील बांधकामाला तडे जाण्यास सुरुवात झाली होती. प्रशासनाने तातडीने खबरदारीचे उपाय केले होते. यामुळे पुढचे संकट टळले. जमीन खचली आणि नवा बस थांबा तसेच इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. पण जीवितहानी टाळण्यात प्रशासन यशस्वी झाले.

जे बांधकाम जमीन खचल्यामुळे कोसळले त्यात दोन बँकांच्या शाखा आणि ३० दुकानांचा समावेश होता. स्टेट बँक आणि कांगडा बँक यांच्या शाखा तसेच ३० दुकानं जमीन खचल्यामुळे कोसळली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version