वसुली प्रकरणी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी निलंबित

वसुली प्रकरणी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी निलंबित

अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आले आहे. सौरक्ष त्रिपाठी यांना निलंबित करण्याच्या राज्य गृह विभागाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे.

सौरक्ष त्रिपाठी यांनी याप्रकरणी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. या जामीन अर्जात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी एफआयआरमध्ये त्यांचे नाव नमूद करण्यात आले नव्हते. पोलीस ठाण्यात अंगडियाकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहिती त्यांना नव्हती. तसेच त्यांच्या जामीन अर्जावर २३ मार्चला सुनावणी होणार आहे.

अगंडिया वसुली प्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी ३ आरोपी हे पोलीस अधिकारी आहेत. दरम्यान, पोलीस चौकशीतून आयपीएस अधिकारी पोलीस त्रिपाठी यांचे नाव समोर आले. त्यांना सौरभ त्रिपाठीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version