युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर

युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर

रशिया-युक्रेन युद्धाचा थेट परिणाम आता भारतीय शेअर बाजाराला बसत आहे. आज सकाळी सेन्सेक्स १३०० अंकानी कोसळला आहे. तसेच शेअर बाजार आज दिवसभर अस्थिर राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम मोठ्या प्रमाणात शेअर बाजारावर झालेला दिसून येत आहे. एसजीएक्स निफ्टीमध्ये ४५८ अंकांची घसरण झाली आहे. निक्केईमध्ये घसरण झाली आहेत तर हँगसँग ७६८ अंकांनी, तैवानचा निर्देशांक ३.१५ टक्क्यांनी घसरला आहे. तसेच बँक निफ्टीमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्केक्समधील सर्व ३० स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे. निफ्टीतील ५०पैकी ४६ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर, शांघाई शेअर बाजाराचा निर्देशांकही १.४५ टक्क्यांनी कोसळला आहे.

युक्रेनच्या चार शहरांमध्ये युद्धविरामाची घोषणा

रशिया-युक्रेन युद्धाचा आज बारावा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धाचा तीढा कायम असून रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. मात्र, अशातच रशियाकडून युक्रेनच्या चार शहरांमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. युक्रेनमधील कीव, खारकीव्ह, सुमी, मारियुपोल या शहरांमध्ये रशियाकडून तात्पुरता युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version