रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला असून सोयाबीनच्या बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. सोयाबीनच्या दरात क्विंटल मागे १५०० रुपयांची वाढ झाली आहे.
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनच्या बाजारात तेजी आली असून वाढलेली सोयाबीनची मागणी आणि उत्पादन घटल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईचा परिणाम सोयाबीन दरावर झाला आहे. बाजारात सोयाबीनचे दर क्विंटल मागे तब्बल १३०० ते १५०० रुपयांनी वाढले आहेत.
रशिया-युक्रेन युद्धामुळे येत्या काळात हवाई प्रवास महागणार असल्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या किंमती ३.२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यानंतर देशातील एटीएफच्या किंमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.