राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह

राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह

एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान

शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेले श्रीराम भक्त हनुमानाचा जन्मोत्सव आज उत्साहात आणि भक्ती भावाने साजरा होत आहे मनमाड येथील दत्त मंदिर रोडवरील रुद्र हनुमान मंडळातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रमही होणार असून सकाळपासूनच भाविकांची मंदिरात मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या असून दत्त मंदिर रोड येथील रुद्र हनुमान मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट ही करण्यात आली होती

रिधुर येथील अवचित हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जळगाव तालुक्यातील रिधुर येथील अवचित हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी मारुतीरायाच्या दर्शनासाठी याप्रसंगी गर्दी केली होती लोण्याचा मारुती म्हणून या हनुमानाची ओळख आहे. हे प्राचीन देवस्थान असून मोठ्या उत्साहाने या ठिकाणी गर्दी करीत असतात भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजन देखील याप्रसंगी यावेळी करण्यात येत असते

झारगडवाडीत हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी

बारामती तालुक्यातील झारगडवाडी या ठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झारगडवाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी हनुमान मंदीरात मोठी गर्दी केली होती. आलेल्या भाविकांना महाप्रसाद म्हणून शिकवडा डिकवड्याचे वाटप करण्यात आले.

हिंगोलीत संतोष बांगर यांच्या हस्ते महाआरती

हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी आज ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर हिंगोली येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विधिवत अभिषेक केला आणि त्यानंतर कार्यकर्त्याच्या उपस्थितीत महाआरती संपन्न केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version