Gwalior Car Accident: अतिवेग जीवावर बेतला; Fortuner चा झाला चुराडा, पाच जणांचा जागीच मृत्यू

या भीषण अपघातामध्ये कारमधील पाच मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी 6.30 वाजता झालेल्या या अपघाताचे कारण वेगावरील नियंत्रण सुटणे आणि बेपर्वाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Gwalior Car Accident: अतिवेग जीवावर बेतला;  Fortuner चा झाला चुराडा, पाच जणांचा जागीच मृत्यू

मध्यप्रदेश: देशात दररोज शेकडो रस्ते अपघात होत आहेत. यात बहुतांश प्रकरणांमध्ये वाहनचालकांची बेपर्वाई, नियमांचे उल्लंघन आणि वेगावर नियंत्रण नसणे ही मुख्य कारणे असल्याचे आढळते. तज्ज्ञांच्या मते, सीटबेल्ट न वापरणे, ओव्हरस्पीड, थकलेल्या अवस्थेत वाहन चालवणे आणि समोरच्या वाहतुकीवर लक्ष नसणे यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडतात.

मध्यप्रदेशातील ग्वालियर येथे नुकत्याच घडलेल्या अपघाताची माहिती समोर आली आहे. ग्वालियर येथे रविवारी पहाटे मोठा अपघात झाला. वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला एका फॉर्च्युनर कारने जबर धडक दिल्याने करमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. ही घटना सिरोल पोलिस स्टेशन हद्दीतील ग्वालियर – झाशी हायवेवर मालवा कॉलेजसमोर सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली. डबरा येथून ग्वालियरकडे येत असताना फॉर्च्युनर कार नियंत्रणाबाहेर गेली आणि रेत भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला समोरून धडकली. धडक इतकी भीषण होती की कारमधील पाचही मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा: Sambhajinagar Crime News : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेच्या गर्भधारणेनंतर समोर आलं सत्य

ग्वालियरच्या सीएसपी (CSP) हिना खान यांनी सांगितले की, “सकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान कंट्रोल रूमला अपघाताची माहिती मिळाली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. कारमध्ये 5 जण होते आणि सर्वांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतक एकमेकांचे मित्र असून डबरा येथून येत होते.” पोलीसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.

जर आपणही वाहन चालवत असाल तर वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. छोटीशी चूक मोठे संकट ओढवू शकते. सुरक्षित वेग, योग्य अंतर आणि नियमांची अंमलबजावणी हे आपले जीवन वाचवू शकते.

हेही वाचा: New Mumbai Airport: ठरलं तर मग! 'या' तारखेला नवी मुंबई विमानतळावरून विमानाची पहिली भरारी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version