Government Banks On Strike: मार्चमध्ये सरकारी बँका 2 दिवस संपावर जाणार! काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या? जाणून घ्या

UFBU ने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, योग्य चर्चा आणि विचारविनिमयानंतर, 24 आणि 25 मार्च 2025 रोजी सलग दोन दिवस संपासह आंदोलन कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Government Banks On Strike: मार्चमध्ये सरकारी बँका 2 दिवस संपावर जाणार! काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या? जाणून घ्या
Edited Image

Government Banks On Strike: पुढील महिन्यात सरकारी बँकांमध्ये दोन दिवसांचा संप होणार आहे. म्हणजेच देशभरात बँका दोन दिवस बंद राहतील. खरं तर, बँक संघटनांनी शुक्रवारी सांगितले की, आठवड्यातून 5 कामकाजाचे दिवस आणि सर्व कॅडरमध्ये पुरेशी भरती यासह त्यांच्या विविध मागण्यांसाठी 24 मार्चपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, नऊ बँक कर्मचारी संघटनांची एक संस्था असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) ने पुकारलेला हा संप सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचारी/अधिकारी संचालकांची पदे भरण्यासाठी देखील पुकारण्यात आला आहे.

UFBU ने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, योग्य चर्चा आणि विचारविनिमयानंतर, 24 आणि 25 मार्च 2025 रोजी सलग दोन दिवस संपासह आंदोलन कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, UFBU ने कामगिरीशी संबंधित प्रोत्साहनांबाबत वित्तीय सेवा विभागाच्या (DFS) अलिकडच्या सूचना तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. 

हेही वाचा – कृषी व्यापाराला चालना देण्यासाठी ई-नाम प्लॅटफॉर्मचा विस्तार; ई-नाम प्लॅटफॉर्मवरील वस्तूंची संख्या पोहोचली 231 वर

ग्रॅच्युइटी कायद्यात सुधारणा करावी –  

या निवेदनात UFBU ने म्हटलं आहे की, वित्तीय सेवा विभागाकडून धोरणात्मक बाबींवर सार्वजनिक बँकांच्या सूक्ष्म व्यवस्थापनामुळे संबंधित मंडळांच्या स्वायत्ततेला धक्का बसला आहे. तसेच इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) सोबतच्या प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्याची आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी योजनेच्या धर्तीवर ग्रॅच्युइटी कायद्यात सुधारणा करून ही मर्यादा 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची आणि आयकरातून सूट देण्याची मागणी केली आहे. 

हेही वाचा – नवा सोपा, सुटसुटीत आयकर कायदा येणार

UFBU च्या संपात या संस्थांचा सहभाग – 

UFBU च्या सदस्यांमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (NCBE), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) यांचा समावेश आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version