Gold Silver Rate Today: चांदीचे दर वधारले तर सोन्याची किंमत घसरली, पाहा मुंबई-पुण्यातील ताजे भाव

आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्ष आणि कच्च्या तेलाचे वाढलेले भाव याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार,
Gold Silver Rate Today: चांदीचे दर वधारले तर सोन्याची किंमत घसरली, पाहा मुंबई-पुण्यातील ताजे भाव

आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्ष आणि कच्च्या तेलाचे वाढलेले भाव याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार, या वर्षाच्या अखेरीस 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव थेट 1 लाख 69 हजार रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकी स्तरावर पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी, (10 सप्टेंबर 2026) सराफा बाजारात सोने वधारले असून चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. या तेजीमागे ब्रोकरेज फर्मने एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे. जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँका आपल्या परकीय चलन साठ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आता डॉलरऐवजी सोन्याचा वापर करत आहेत.

 गोल्डमन सॅक्स (Goldman Sachs)  म्हणजे काय?

ही एक आघाडीची अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा कंपनी आहे, जिची स्थापना 1869 मध्ये झाली होती. ही पारंपारिक किरकोळ बँक नसून, एक बल्क ब्रोकरेज आणि इन्व्हेस्टमेंट फर्म आहे जी प्रामुख्याने सरकारे, मोठ्या कॉर्पोरेशन्स, केंद्रीय बँका आणि उच्च-निव्वळ-संपत्ती असलेल्या गुंतवणूकदारांसाठी कार्य करते.जागतिक कमोडिटी मार्केट, विशेषतः सोन्या-चांदीच्या किंमतीवर या संस्थेचा थेट प्रभाव असतो. Goldman Sachs COMEX आणि LBMA सारख्या आंतरराष्ट्रीय एक्सचेंजवर मोठ्या प्रमाणात सोन्याचे व्यवहार करते आणि त्यांचे संशोधन अहवाल व बाजारातील अंदाज हे जागतिक बाजारासाठी बेंचमार्क मानले जातात. त्यांच्या खरेदी-विक्रीच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्पॉट प्राइसमध्ये चढ-उतार होतो, ज्याचा थेट परिणाम भारतीय बाजारातील सोन्याच्या दरावर होतो.

हेही वाचा – Sugar Price: सणासुदीच्या काळात साखर होणार स्वस्त? वाढत्या दरांना लगाम घालण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; ग्राहकांच्या खिशाला मिळणार मोठा दिलासा

सोन्याचे दर 0.06% घसरणीनंतर 1,53,670 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचे दर 0.40% घसरणीनंतर 2,43,229 रुपये प्रति किलोग्रॅम या पातळीवर उघडला. काल देशांतर्गत कमोडिटी वायदा बाजारात सोन्याचे दर 0.03% घसरणीनंतर 1,53,721 रुपये प्रति 10 ग्रॅम तर, चांदीचे दर 2.04% तेजीनंतर 2,44,200 रुपये प्रति किलोग्रॅम या पातळीवर थांबला होता.

जानेवारी 2026 च्या अखेरीस MCX वर सोने आणि चांदीच्या किमतींनी आजवरचा उच्चांक नोंदवला होता. त्यावेळी सोन्याचे दर 1,80,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचे दर 4,20,000 रुपये प्रति किलोग्रॅम या पातळीवर पोहोचलेला.गुरुवारी कॉमेक्सवर सोन्याचा दर 4,455.70 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर 68.085 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे.

आज देशात चांदीच्या दरातही किरकोळ घसरण नोंदवली गेली आहे. आज चांदीचा दर 360 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 2,43,220 रुपये प्रति किलो झाला आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, वडोदरा आणि अहमदाबाद या शहरांमध्ये आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 2,499 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये हा दर काहीसा जास्त म्हणजेच 2,549 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version