Gold-Silver Price Today: आयात शुल्क वाढताच सुवर्णबाजारात खळबळ! एका दिवसात सोनं 12 हजारांनी तर चांदी तब्बल 30 हजारांनी महाग

केंद्र सरकारने मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवल्यानंतर जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
Gold-Silver Price Today: आयात शुल्क वाढताच सुवर्णबाजारात खळबळ! एका दिवसात सोनं 12 हजारांनी तर चांदी तब्बल 30 हजारांनी महाग

जळगाव: केंद्र सरकारने मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्यानंतर देशभरातील सराफा बाजारात खळबळ उडाली असून त्याचे तीव्र पडसाद जळगावच्या सुवर्ण बाजारातही उमटले आहेत. ‘सुवर्णनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये एका दिवसात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली असून सराफा बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंवर 15 टक्के आयात शुल्क लागू केले आहे. या निर्णयानंतर जळगावातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 12 हजार रुपयांची वाढ झाली. तर चांदीच्या दरात एकाच दिवसात सुमारे 30 हजार रुपयांची उसळी पाहायला मिळाली.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana : e-KYC पूर्ण असूनही 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे रखडले; मार्च-एप्रिलचा हप्ता कधी येणार? वाचा महत्त्वाची अपडेट

सध्या जळगाव बाजारात जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 1 लाख 62 हजार रुपयांवर पोहोचला आहे. त्याचवेळी चांदीचे दरही झपाट्याने वाढत असून जीएसटीसह एक किलो चांदीसाठी ग्राहकांना जवळपास 2 लाख 98 हजार रुपये मोजावे लागत आहेत. या विक्रमी दरवाढीमुळे लग्नसराईत खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.

सराफा व्यावसायिकांच्या मते, आयात शुल्क वाढल्यामुळे परदेशातून सोने-चांदी आणणे महाग झाले असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. तसेच जागतिक स्तरावरील आर्थिक अस्थिरता, मध्यपूर्वेतील तणाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यामुळेही दर वाढण्यास हातभार लागत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Gold Import Duty: सराफा बाजारात मोठा फेरबदल; सोने-चांदी आणखी महाग होणार; सरकारकडून आयात शुल्कात मोठी वाढ

आगामी काळातही सोन्या-चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता असली तरी सामान्य ग्राहक मात्र खरेदीपासून दूर राहत असल्याचे चित्र आहे.

नेहमी ग्राहकांनी गजबजलेला जळगावचा सुवर्ण बाजार आज तुलनेने शांत दिसून आला. वाढत्या दरांमुळे अनेकांनी खरेदी पुढे ढकलल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आगामी काही दिवसांत बाजारातील परिस्थिती आणखी बदलू शकते, त्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष आता केंद्र सरकारच्या पुढील निर्णयांकडे लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version