Sujay Vikhe Patil : महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादीच्या नेत्यावर भाजपच्या माजी खासदाराने साधला निशाणा; म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी सर्वांची बाजू ऐकून…’

Sujay Vikhe Patil : महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादीच्या नेत्यावर भाजपच्या माजी खासदाराने साधला निशाणा; म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी सर्वांची बाजू ऐकून…’

अहिल्यानगर : कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याच्या मुद्द्यावरून आपण अजित पवारांसोबत आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी भाषणादरम्यान बोलले, तर या कामाला आता स्थगिती दिल्याच्या चर्चांना उधाण आल्याने यावरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील आणि स्थानिक शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असून राज्य सरकारने कामाला स्थगिती दिल्याचा देखील दावा केला जात आहे. यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेत स्थगितीबाबत कोणताही शासन निर्णय माहिती नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा : Pune Crime : पुण्यातील भारती विद्यापीठात शिकणाऱ्या 21 वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृत्यू; नवव्या मजल्यावरून मारली उडी, पोलिसांकडून तपास सुरू

अहिल्यानगरवर वर्षानुवर्षे पाण्यासाठी अन्याय झाला असून आम्ही हक्काच्या पाण्यासाठी लढत राहणार आहे. मात्र या संदर्भात अनेक गोष्टी माझ्याकडे आहे, जेणेकरून या सर्व गोष्टींना वेगळे आयाम मिळेल. मात्र मला वाद निर्माण करायचा नाही. वाद किंवा वादग्रस्त विधान करायचं असेल तर मीही करू शकतो. माझ्याकडेही अनेक कागदपत्रे, पुरावे आहेत. ज्यामध्ये कोणी काय सहमती दिली हे सगळं माझ्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांची बाजू ऐकून योग्य न्याय द्यावा, अशी मागणी सुजय विखे यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version