पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

पुण्यातील सदाशिव पेठेत आज सकाळी एका एमपीएससी करणाऱ्या तरूणीवर प्राणघातक हल्ला झाला आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने बाईकवर असणाऱ्या तरुणीवर कोयत्याने वार केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर एका विद्यार्थ्याने या विद्यार्थिनीचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याने घडलेला घटनेचा थरार सांगितला आहे. मात्र स्थानिक तरुणांनी मोठ्या धाडसाने हल्लेखोर विकृत तरुणाला पकडलं आणि तरुणीचा जीव थोडक्यात वाचला.

काही दिवसांपूर्वी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही भररस्त्यात एका तरुणीवर निर्घृणपणे रस्त्यात वार करण्यात आले होते. तिथं उपस्थित असलेल्या जमावाने आरोपीला रोखण्याचं धाडस न दाखवल्याने त्या तरुणीचा मृत्यू झाला होता. मात्र पुण्यात दोन तरुणांनी जीवावर उदार होत तरुणीचे प्राण वाचवल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version