मुंबई:कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी ही तक्रार दाखल करत दीपके यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. फैजान अन्सारी यांनी दिल्लीतील डीसीपी कार्यालयात तक्रार सादर केली. त्यामध्ये त्यांनी अभिजीत दीपके यांच्यावर देशविरोधी संबंध असल्याचा तसेच काही वादग्रस्त व्यक्तींशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय दीपके यांच्या समर्थकांकडून स्वतःवर दोन वेळा हल्ला झाल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
तक्रारीत नेमके कोणते आरोप?
तक्रारीनुसार, अभिजीत दीपके यांच्यावर पाकिस्तानशी संबंधित असल्याचा तसेच काही व्यक्तींना आंदोलनासाठी आर्थिक मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांना अद्याप कोणत्याही तपास यंत्रणेने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे या आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. फैजान अन्सारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्यावर हल्ले झाल्याची तक्रार त्यांनी यापूर्वीही नोंदवली आहे. या सर्व घटनांमागे दीपके यांच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
#WATCH | Delhi: On filing a police complaint against CJP founder Abhijeet Dipke, a social media influencer, Faizan Ansari says, “Today, I have filed a written complaint against Abhijeet Dipke, the founder of the CJP party, with the Delhi DCP, because I have proof that his men… pic.twitter.com/Fol499Cmpi — ANI (@ANI) August 4, 2026
अटकेची मागणी
तक्रारीत अभिजीत दीपके यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, वेळेत कारवाई झाली नाही तर भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावाही तक्रारदाराने केला आहे.
पोलिसांकडून अद्याप भूमिका स्पष्ट नाही
फैजान अन्सारी यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली असली, तरी या प्रकरणावर अद्याप दिल्ली पोलिसांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. तसेच, अभिजीत दीपके किंवा त्यांच्या पक्षाकडूनही या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.