राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना आर्थिक गैरव्यवहार अटक करण्यात आली आहे. मलिकांवर झालेल्या आरोपांमुळे सत्ताधारी नेते आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मलिकांच्या राजीनाम्यासाठी राज्यात ठिकठिकाणी भाजपचे आंदोलन झाले. यावेळी मलिकांवर टीका करताना भाजप आमदार महेश लांडगे यांची जीभ घसरली. देशद्रोही असणाऱ्या मलिकांना अटक नाही, तर भरचौकात फाशी द्या, असे वादग्रस्त वक्तव्य महेश लांडगे यांनी केले आहे.
नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून मविआ नेत्यांकडून मुंबईतील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे विरोधक मलिकांच्या मंत्रीपदाच्या राजीनामाची मागणी करत आहे. याचे पडसाद पिंपरी चिंचवडेमध्ये उमटले. मलिकांच्या राजीनाम्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने आंदोलन केले. मात्र यावेळी घोषणाबाजी करताना भाजप आमदार महेश लांडगे यांनी नवाब मलिकांचा एकेरी उल्लेख केला. तसेच दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिकांना अटक नाही, तर भर चौकात फाशी द्या, अशी मागणी त्यांनी केली.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांन ३ मार्चपर्यंत आठ दिवसांची कोठडी सुनावली आहे. मलिकांवर झालेल्या कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी नेते आणि विरोधक आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तर विरोधक मंत्रीपदाची राजीनाम्याची मागणी करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.