DJ आणि डॉल्बीवर बंदी आणता येणार नाही, SP निखिल पिंगळेंचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय म्हणाले..

DJ Dolby Ban: राज्यात काही दिवसांपासून एकाच विषयाला उधाण आलं आहे. विद्यानंद बापट यांच्या नेतृत्वात DJ बंदीला घेऊन ठीकठीकाणी आंदोलने होत आहेत.
DJ आणि डॉल्बीवर बंदी आणता येणार नाही, SP निखिल पिंगळेंचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय म्हणाले..

DJ Dolby Ban: राज्यात काही दिवसांपासून एकाच विषयाला उधाण आलं आहे. विद्यानंद बापट यांच्या नेतृत्वात DJ बंदीला घेऊन ठीकठीकाणी आंदोलने होत आहेत. याविरुद्ध DJ बंदीला रोखण्यासाठी देखील अनेक गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे. अशातच SP निखिल पिंगळे यांनी सर्वांना DJ आणि डॉल्बी मधील फरक समजावत, आपल्या संकल्पना कशा चुकीच्या आहेत यावर भर दिला. तसेच डॉल्बी ही टेक्नॉलॉजी असल्याने त्यावर सर्वोच्च न्यायालयाने यावर बंदी घालायला कुठेच सांगितले नाही, असे सुद्धा म्हटले.

निखिल पिंगळे नेमक काय म्हणाले?

डॉल्बी म्हणजे काय आहे, तर ही टेक्नॉलॉजी आहे. DJ म्हणजे गाणी बदलणारा माणूस जसे डिस्को जॉकी/ रेडिओ जॉकी, त्यामुळे DJ वर बंदी म्हणजे त्या माणसावर बंदी त्याचा स्पीकरच्या आवाजाच्या मर्यादेशी दूरदूर संबंध नाही. त्यामुळे त्याच्यावरही बंदी येऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत अगदी रास्त निर्णय दिला आहे. माणसाच्या जीवाला त्रास होणार नाही, इतक्या आवाजाची मर्यादा ओलांडू देऊ नका, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. पण आपल्या याबाबतच्या संकल्पनाच चुकीच्या आहेत. त्यामुळे डीजे बंदी होऊच शकत नाही, असे निखिल पिंगळे यांनी म्हटले. 
परंतु स्पीकरचे व्हेंडर आहेत, त्यांनी आता आयडिया काढली आहे, त्यांनी नवीन तंत्रज्ञान प्लाझ्मा, मिड प्रेशर बेस साऊंड सिस्टीम असे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन स्पीकर दिसतात पण त्यांचा आवाज दहा स्पीकरच्या बरोबर असतो मात्र व्हॉल्युम काउन्ट हा कमी दिसतो. अशाप्रकारचे ऑगमेंटेड साहित्य असेल स्पीकर सोडून तर ते जप्त केले जाईल, असे देखील बजावले.
कारण मुद्दा आवाजाच्या मर्यादेचा आहे, तरुण मुलांचे कान खराब होत नाहीत, असे नाही. तुम्ही मोठ्या आवाजात स्पीकर लावणार असाल तर आधी संबंधित मंडळातील अध्यक्षांच्या घरातील आजी-आजोबांना तिथे नेऊन बसवा. अध्यक्ष जर वरिष्ठ असेल तर त्यांना स्पीकर जवळ आणून तेथे बसवा, असेही निखिल पिंगळे यांनी म्हटले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version