डिझेलच्या दरात २५ रुपयांची वाढ

डिझेलच्या दरात २५ रुपयांची वाढ

आंतरराष्ट्रीय सत्रावर तेलाच्या किंमती ४० टक्क्यांनी वाढल्या असल्यामुळे डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर जारी केले आहेत. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रतिलीटर २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

घाऊक खरेदी करणाऱ्या कंपन्या, आस्थापने, उद्योग यांना डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. डिझेल खरेदी करताना आता प्रति लीटरमागे २५ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. मुंबईत ९४ रुपयांचे डिझेल घाऊक इंधन खरेदीदारांसाठी १२२ रुपयांना विकले जाईल. मात्र, किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नाही.

दरम्यान, डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रातून राज्य सरकार तसेच पालिकेच्या बसेसना डिझेलच्या वाढलेल्या दरातून दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

त्यांनी पत्रात लिहिले की, ‘राज्य तसेच मुंबई पालिकेच्या बसेसचा समावेश घाऊक खरेदीदारांमध्ये केल्याचा राज्य तसेच पालिकेच्या बससेवेवर मोठा परिणाम होईल. राज्य सरकार तसेच पालिकेच्या बससेवेला डिझेलच्या वाढलेल्या दरातून दिलासा देत वगळावे अशी विनंती करतो.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version