‘सध्यातरी ऑफलाईनच परीक्षा’ – बच्चू कडू

‘सध्यातरी ऑफलाईनच परीक्षा’ – बच्चू कडू

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सध्यातरी ऑफलाईनच होणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.

शिक्षणाशी संबंध नसलेल्या लोकांचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग असल्याचे बच्चू कडू म्हणाले. पुढे ते म्हणाले, काही विद्यार्थी आक्रमक होऊन रस्त्यावर आले म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे मत आहे, असे म्हणता येणार नाही. विद्यार्थ्यांची मागणी काय आहे? तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे आयोजन कोणी केले? याची चौकशी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असा निर्णय घेऊ, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.

‘हिंदुस्थानी भाऊ’च्या आवाहनानंतर आंदोलन भडकले

हिंदुस्थानी भाऊ यांनी सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचे आवाहन केले. तसेच मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही ते सहभागी झाले होते. परीक्षा ऑफलाईन घेण्याऐवजी ऑनलाईन घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे ऑफलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांबाबत खेळ का करतात? असा सवाल हिंदुस्थान भाऊ उर्फ विकास फाटक यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिक्षकांन त्यांच्या जीवाची काळजी आहे. तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? असेही ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version