छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मॉरिशसमध्ये लोकार्पण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मॉरिशसमध्ये लोकार्पण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येत्या २८ एप्रिल रोजी शुक्रवारी मॉरिशसमध्ये लोकार्पण होणार आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीणकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

मॉरिशसमधील या लोकार्पण सोहळ्याला ७५ हजार भारतीय उपस्थित राहणार आहेत. हे भारतीय महाराष्ट्रातील पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकणातून असणार आहेत. या मराठी बांधवांनी परदेशातही मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या बांधवांच्या सुमारे ५४ संघटना आहेत. या सर्व संघटनांना मिळून मॉरिशसमध्ये १ मे १९६० रोजी मराठी मंडळी फेडरेशनची स्थापना करण्यात आली आहे. मॉरिशसमध्ये मराठी बांधव शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी हे मराठमोळे सण मोठ्या उत्साहात साजरे करतात. तसेच मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यात आले असून त्याचा विस्तारासंदर्भातील सुद्धा काही मागण्या आहेत.

मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच, या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी या सोहळ्यासाठी ८ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. ८ मार्च २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी तसेच महाराष्ट्र भवनाच्या पुढील विस्तारासंबंधी मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए. गानू आणि फडणवीस यांची भेट झाली होती. तसेच, दौऱ्यादरम्यान मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांना सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटणार आहेत.

फडणवीसांच्या उपस्थितीत विदेशात झालेले कार्यक्रम

  • लंडनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक
  • जपानच्या कोयासन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण
  • रशियात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version