प्रकरण ठाण्याचे, वाद नवी दिल्लीत

प्रकरण ठाण्याचे, वाद नवी दिल्लीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणावर ठाकरे आणि शिंदे गटात राजकीय वाद पेटलेलं असतानाच आता शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. तसेच महिलांना पुढे करून राजकारण करणारे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांची चौकशी करा, अशी मागणी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.

रोशनी शिंदे मारहाण प्रकरण चांगलेच पेटले आहे. या प्रकरणी काल ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी अमित शहांची भेट घेऊन देवेंद्र फडणीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ठाण्यात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आता शिंदे गटही आक्रमक झाला आहे. खासदार भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, कृपाल तुमाने यांनी रोशनी शिंदे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज नवी दिल्लीत भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शहा उपस्थित नव्हते. तेव्हा त्यांनी अमित शहा यांच्या कार्यालयात निवेदन देऊन विरोधकांवर कारवाई करण्याची मागणी केली.

भावना गवळी म्हणाल्या की, ठाकरे गटानं रोशनी शिंदे प्रकरण लावून धरलं आहे. ते त्या ठिकाणी गेले. परंतु पोलिसांचा जो अहवाल आला आहे, त्यात असे काहीही झाले नाही. मी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, परंतु पोलिसांच्या अहवालात तसं काहीही झालेलं दिसून आलं नाही. रोज सकाळी उठायचं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करत सुटायचं, कोणी तरी सकाळी उठायचे. निवेदन करायचे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करायचे. अशा प्रकारची कारवाई विरोधी पक्षांकडून सुरू आहे. असे लोक जे खोटे बोलतात. त्यांची आधी चौकशी केली पाहिजे. त्यांच्यावरच गुन्हे दाखल करा, ही मागणी मी माझ्या निवेदनामध्ये केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version