Bollywood ने दिला ISRO च्या शास्त्रज्ञांना धीर!

Bollywood ने दिला ISRO च्या शास्त्रज्ञांना धीर!

चांद्रयान-2 अवकाशात महत्वाचे टप्पे पार करुन चंद्राजवळ पोहोचलं. परंतु शेवटच्या अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. चांद्रयान-2 मोहिमेला अपयश आल्यामुळे शास्त्रज्ञ निराश झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र शास्त्रज्ञांना हिंमत न हारण्याचा संदेश दिला. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान वाटतो, असं म्हणत शास्त्रज्ञांना भविष्यातील मोहिमेसाठी प्रोत्साहनही दिलंय.

पंतप्रधानांप्रमाणेच Bollywood च्या कलाकारांनीही ISRO च्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलंय.

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी ISRo च्या वैज्ञानिकांना धीर देणारं चित्र ट्विट करत मोहिमेला आलेलं अपयश ही नव्या यशाची नांदी असल्याचं म्हटलं.

तू ना थके गा कभी ,   तू  ना मुडे गा कभी,

कर शपथ कर थपथ कर शपथ , अग्नीपथ अग्नीपथ अग्नीपथ.  असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 


” गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले” ,  हा प्रसिद्ध शेर Tweet अभिनेते अनुपम खेर यांनी ISRO च्या वैज्ञानिकांचं कौतुक केलंय.

आपण यशस्वी होई, अशी आशा व्यक्त करत खऱ्या अर्थाने भविष्य त्यांचंच असतं, जे  स्वप्नांवर विश्वास ठेवतात, असं  अभिनेता रितेश देशमुख याने म्हटलं. इस्रोच्या टीमचा मला अभिमान आहे असं त्याने Tweet केलंय.

अभिनेता आर. माधवन याने ISRO टीमला धीर देताना आपल्या ब्लॉकबस्टर ‘3 इडियट्स’ सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग Tweet केलाय. ‘ऑल इज वेल’ म्हणत माधवन याने वैज्ञानिकांना प्रोत्साहित केलंय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version