टेलिव्हिजनवरील बहुचर्चित रिअलिटी शो म्हणजे 'बिग बॉस' हा 6 सप्टेंबर पासून कलर्स वाहिनी व जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलीवूड अभिनेते सलमान खान हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. प्रेक्षकांमध्ये या शोविषयी दरवर्षी एक उत्सुकता असते, यातील टास्क, गेम्स हे मजेशीर असून ते खेळणाऱ्या स्पर्धकांबद्दल प्रेक्षकांशी एक भावनिक नाळ जोडली जाते. यात वोटींगमुळे प्रेक्षक त्यांच्या आवडत्या सदस्याला घरातून बेघर होण्यापासून वाचवू शकतात. त्याबरोबरच शो मधील क्लीप्सद्वारे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडतो. यामुळे निरनिराळे ट्रेंड्स पाहायला मिळतात. या सीझनमध्ये निखळ मनोरंजन करणारी ही मंडळी कोण असेल असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.
तरी या वर्षीची स्पर्धकांची तूर्तास यादी जाहीर झालेली असून, ती नावे खालीलप्रमाणे आहेत.
माही विज
बालिका वधू' आणि 'लागी तुझसे लगन' यांसारख्या टीव्ही मालिकांसाठी ओळखली जाणारी असून ही बिग बॉस 20 मधील निश्चित स्पर्धकांपैकी एक आहे.
अर्शिफा खान
बालकलाकार आणि सोशल मीडियावरील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व अर्शिफा खान हिचे नावही या सीझनसाठी निश्चित झाल्याची बाब समोर येत आहे.
कनिका मान
टेलिव्हिजन अभिनेत्री कनिका मान ही 'गुड्डन तुमसे ना हो पाएगा' मधील भूमिकेसाठी ती ओळखली जाते.
ईशा रिखी
पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी ही निश्चित स्पर्धकांच्या यादीत समाविष्ट असल्याचे समजते. तिने 'हॅपी गो लकी' (Happy Go Lucky), 'व्हॉट द जट' (What the Jatt) आणि 'नवाबजादे' (Nawabzaade) यांसारख्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
काझी तौकीर
गायक आणि रिअॅलिटी-टीव्ही व्यक्तिमत्त्व काझी तौकीर याचे नावही बिग बॉस 20 साठी निश्चित झाल्याचे वृत्त आहे. 20०५ मध्ये 'फेम गुरुकुल' (Fame Gurukul) जिंकल्यानंतर तो प्रसिद्धीझोतात आला होता आणि आता या नवीन सीझनद्वारे तो पुन्हा एकदा रिअॅलिटी-टीव्हीच्या प्रकाशझोतात परतण्यास सज्ज आहे.
ही सदस्य नामावली ठाम नसून ही स्पर्धकांची यादी संभाव्य आहे. तरी प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली असून 6 सप्टेंबरला यावर खुलासा होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.